छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन..

महाराष्ट्र राज्याचे वैभव, सर्व जाती धर्माच्या बुद्धीजीवी व्यक्तींचे आदर्श, रयतेचे राज्य निर्माण करून अतिशय उज्वल व उत्तम प्रकारे चालवणारे, समता स्वातंत्र्य बंधुभावाचे पुरस्कर्ते असलेले, आपणा सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
बीड शहरातल्या केएसके महाविद्यालयात सध्या स्वराज्य सप्ताह राबवला जात असून आज छत्रपती शिवरायांवर आधारित रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धो आयोजित करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयातील तरुण तरुणींनी अत्यंत आकर्षक रांगोळ्या व छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील प्रेरणादायी घटनांना उजाळा देत आज शिवरायांना अभिवादन केले..
सोलापूरातही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं रॅली आणि चित्ररथ देखाव्याचं आयोजन केलं होतं. उद्या सर्वत्र आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात शिवप्रेमी बांधव व्यस्त होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत