देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

सप्त ऋषींची संकल्पना ही भ्रमवाद्यांनी सप्त बुद्धांपासूनच चोरलेली आहे.

काही बौद्ध ग्रंथांमध्ये 28 बुद्धांचे नावे आहे आणि काही बौद्ध ग्रंथ असेही आहेत की ज्यामध्ये केवळ 24 बुद्धांची नावे आहे.

ज्यामध्ये 28 बुद्धांची नावे आहे, त्यामध्ये पहिल्या बुद्धाचे नाव तनहंकर बुद्ध हे आढळते आणि ज्या ग्रंथामध्ये 24 बुद्धांची नावे आहे, त्या ग्रंथांमध्ये पहिल्या बुद्धाचे नाव दीपंकर बुद्ध असे आढळते.

असे म्हणतात की दीपंकर बुद्धाच्या अगोदर सुरुवातीचे तीन बुद्ध (तनहंकर, मेधंकर आणि सरणंंकर बुद्ध) हे काही बोधिसत्व नव्हते. त्या कारणामुळे हे तीनही बुद्ध 24 बुद्धांच्या यादीमध्ये त्यांची नावे घेण्यात आलेली नाही.

28 बुद्धांपैकी सप्त बुद्धांची स्तुती बौद्ध साहित्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. दिघनिकाय च्या महाप्रदान सूत्त्ता मध्ये सप्त बुद्धाचे विस्तृत वर्णन आलेले आहे.

सप्त बुद्धां मध्ये विपस्सी बुद्ध , सीखी बुद्ध, वेस्सभू बुद्ध, ककूसंध बुद्ध, कोणागमन बुद्ध, कस्सप बुद्ध, आणि गौतम बुद्ध यांचा समावेश आहे. सप्त बुद्धांच्या या मंडळी(टीम) पैकी पाच नावे भरहुत स्तुपावर कोरलेले आहे.

सिखी बुद्धाचे नाव स्पष्ट नाही आहे आणि वेस्सभू बुद्धाच्या नावाऐवजी ” भगवतो बोधी सालो ” असे लिहिलेले आहे. बाकी पाच बुद्धांची नावे दोन हजार वर्षापूर्वी भरहूत स्तुपावर कोरल्या गेलेली आहे. ही सर्व नावे प्राकृत भाषा आणि धम्म लिपी मध्ये आहे.

उदाहरणादाखल एका मध्ये लिहिलेले आहे – भगवतो कोणागमनस्स बोधी आणि दुसऱ्या मध्ये लिहिलेले आहे – भगवतो विपस्सिनो बोधी.

सप्त बुद्धांचे दुसरे प्रमाण ( प्रमाणित पुरावा) साची स्तुपावर आढळून येत आहे. येथे तीन स्तूप आणि चार बोधिरुक्ष च्या माध्यमातून सप्त बुद्धांना दाखविलेले आहे.

सप्त बुद्धांचा तिसरा प्रमाणित पुरावा एलोरा च्या बौद्ध लेणी क्रमांक 12 मध्ये आपणास आढळून येते. येथे सप्त बुद्धांना दगडावर कोरले असल्याचे आपणास दिसून येते.

सप्त ऋषींची संकल्पना भ्रम वाद्यांनी या सप्त बुद्धांपासूनच चोरलेली आहे. जर ही संकल्पना सप्त बुद्धांपासून चोरलेली नाही तर मग सप्त बुद्धांच्या अगोदर भ्रम वाद्यांनी सप्त ऋषींच्या पुरावे द्यावेत.

16 करोड वर्षांपूर्वीचे डायनासोरचे पुरावे आढळतात ,8000 वर्षांपूर्वीचे गव्हाचे (जव)दाणे आढळतात तर मग या ऋषींच्या आश्रमाचा पुरावा आजपर्यंत कोणालाही का मिळालेला नाही ?
प्रा. गंगाधर नाखले
01/12/2024
9764688712,7972722081

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!