‘मंगळसूत्र चोर अशी गोपीचंद पडळकर यांची ओळख’, – अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केला पटलवार.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर पटलवार केला आहे. इतकंच नाही तर अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत असे म्हटले की, ‘गोपीचंद पडळकर हा तुमचा पालतू कुत्रा अवकातीच्या बाहेर भुंकलेला आहे. ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर म्हणून आहे. जो समाजाचा, सख्या भावाचा, देवाचा होऊ शकला नाही. अशा गोप्याला तुम्ही वेळेच आवर घाला, वेसन घालावं नाहीतर त्यांना वेसन घालण्याची ताकद अजित दादांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे’, असे म्हणत मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे . मंगळसूत्र चोर हीच गोपीचंद पडळकर यांची ओळख असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत