राम सातपुते यांना मराठा समाजाचा तीव्र विरोध; सभेच्या ठिकाणी येऊ दिलं नाही

Solapur : मोहोळ तालुक्यातील वडवळ या गावी भाजपा चे लोकसभा 2024 चे उमेदवार राम सातपुते यांची सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु गावातील मराठा आंदोलक तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपा बद्दलचा रोष जाहीर केला आणि सभा उधळून लावली.
सत्ताधाऱ्यांची कोणतीही सभा किंवा कार्यक्रम होऊ देणार नाही असा पावित्रा घेतलेल्या मराठा आंदोलकांच्या या तीव्र विरोधाचा सामना करणे भाजपा कार्यकर्त्यांना शक्य झाले नाही आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला. जनतेच्या या रोषामुळे राम सातपुते सभेच्या ठिकाणी येऊ शकले नाहीत. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत