स्त्री सुरक्षित नाही
दत्ता गायकवाड
भारत देशात स्त्रीची अवहेलना जेवढी होते आहे. तेवढी जगात कुठेही होत नाही. स्त्रीचे शोषण हा आमचा अधिकार आहे ती तुच्छ भावना समाजातील समस्त पुरुष वर्गामध्ये आहे. या शोषण व्यवस्थेला धार्मिक अधिष्ठान असल्याचे ते उच्च रवाने सांगत असतात स्त्री कितीही शिकली तरी तीच स्थान आपल्या चपलीच्या अंगठ्याजवळच असते. ही भावना पुरुषांमध्ये आहे कार्यालयात कारखान्यात शाळा कॉलेजमध्ये मुली सुरक्षित नाही. तर रोजच्या वर्तमानपत्रात शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनीवर होणारे अतिप्रसंग समाजाला लाजवणारे आहे. हे दृषकृत्य समाजाला संस्कार देणाऱ्या शिक्षकाकडून होते. शाळा कॉलेजस ट्युशन क्लासेस यामध्ये मुली सुरक्षित नाहीत. अज्ञानामुळे अंधश्रद्धेमुळे देवदासी म्हणून सोडणाऱ्या मुली यांना पुढे वेश्याव्यवसायात ओढले जाते. व्यवसाय करू नका यासाठी बाबासाहेबांनी मुंबईतील कामाठ पुऱ्यात सभा घेतली होती. आदर्श समाज असावा ही बाबासाहेबांची मनीषा होती. दत्ता गायकवाड सोलापूर 7588 266710
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत