“जर पोलिसांना 15 सेकंदासाठी हटवलं तर या ओवेसी भावांचा पत्ता लागणार नाही की कुठून आले आणि कुठून गेले !” – भाजपा उमेदवार नवनीत राणा

हैदराबाद: लोकसभा 2024 ची निवडणूक प्रक्रिया आता अर्ध्यावर आली असून तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. भाजपा नेत्यांनी निवडणूक आयोगाला दुर्लक्षित करत हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपली मुस्लिम विरोधी भूमिका स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी सुध्दा उघडपणे मुस्लिम समुदायाच्या विरूध्द जाहीर सभेमध्ये वक्तव्य करत आहेत.
हैदराबाद येथे भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांचा मशिदिकडे बाण सोडण्याची सांकेतिक कृती दर्शविणारा व्हिडिओ बराच चर्चेत आला होता व त्यावर भाजपा वर भरपूर टीकाही झाली होती. त्यात भर म्हणून भाजपाच्या चिन्हावर अमरावती येथून उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांनी माधवी लता यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल. यांच्या एका विधानानुळे नवा वाद निर्माण झाला आहे. नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये अकबरुद्दीन ओवेसी आणि त्यांचे भाऊ असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला. “जर पोलिसांना 15 सेकंदासाठी हटवलं तर या भावांचा पत्ता लागणार नाही की कुठून आले आणि कुठून गेले,” असं विधान केलं आहे.
“छोटा भाऊ म्हणतो की पोलिसांना 15 मिनिटं हटवा आम्ही काय करु शकतो हे दाखवून देतो. त्याला मला सांगायचं आहे की, तुला 15 मिनिटं लागतील पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील. 15 सेकंदानंतर छोट्याला कुठून आलो आणि कुठे गेलो हे समजणार नाही,” असं विधान नवनीत राणा यांनी केलं आहे.
अकबरुद्दीन ओवेसी यांनी 2013 मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी हे विधान करत जुना वाद नव्याने समोर आणला आहे.
दरम्यान नवनीत राणा यांच्या विधानाचा समाचार घेत असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर दिलं आहे. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगत आहे की, त्यांना 15 सेकंद द्या. त्या काय करणार आहेत? त्यांना 15 सेकंद नको तर 1 तास द्या. त्या काय करु शकतात हे आम्हालाही पाहायचं आहे. त्यांच्यात काही माणुसकी उरली आहे का? कोण घाबरलं आहे? आम्ही तयार आहोत. जर कोणी असं जाहीर आव्हान देत असेल तर देऊ देत. कोण त्यांना थांबवत आहे?” अशा शब्दात त्यांनी पलटवार केला.
हैदराबाद चे रूपांतर हळूहळू पाकिस्तान मध्ये होत आहे, परंतु माधवी लता या हैदराबादला पाकिस्तानात रुपांतरित होण्यापासून रोखतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत