अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यात भारतीय दुसऱ्या क्रमांकावर – ‘यूएस नॅचरलायझेशन पॉलिसी’ चा अहवाल.

पाच ट्रिलियन ची अर्थव्यवस्था, विश्वगुरु पदाचा प्रवास, संविधान बदलून हिंदू राष्ट्र बनविणे या सर्व युक्त्या वापरून ही लोक भारत सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.
अमेरिकन नागरिक बनणाऱ्या भारतीयांची संख्या सातत्याने वाढत आहे. असे असताना यूएस काँग्रेसच्या अहवालानुसार 2022 मध्ये 65,960 भारतीय अधिकृतपणे अमेरिकेचे नागरिक झाले आहेत. अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यात भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर पहिल्या क्रमांकावर 2022 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यात मेक्सिकन आहेत. यूएस जनगणना विभागाने केलेल्या अमेरिकन समुदाय सर्वेक्षणानुसार, 2022 मध्ये एकूण 46 दशलक्ष परदेशी नागरिक अमेरिकेत वास्तव्यास होते. ही संख्या अमेरिकेच्या 33 कोटी 30 लाख लोकसंख्येच्या 14 टक्के आहे. एकूण 53 टक्के म्हणजेच दोन कोटी 45 लाख नागरिक नैसर्गिक नागरिक म्हणून नोंदणीकृत आहेत.
15 एप्रिलच्या ‘यूएस नॅचरलायझेशन पॉलिसी’ अहवालानुसार आर्थिक वर्ष 2022 मध्ये 969,380 लोक अमेरिकन नागरिक बनले. तर अमेरिकन नियमांनुसार नागरिकत्व मिळवण्याच्या बाबतीत मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ भारत, फिलीपिन्स, क्युबा आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील लोकांचा क्रमांक लागतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत