दिनविशेष बुधवार दिनांक 8 मे 2024

आज दि. ८ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, बुधवारो, चेत मासो, बुधवार, चैत्र माहे.
८ मे १९३३ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील वृत्तपत्रात गांधीजीने नव्याने सुरुवात केलेल्या आत्मशुद्धीच्या उपोषणासंबंधी वाचले.
८ मे १९५० – रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.
८ मे १९५४ – रोजी देहू रोड, जिल्हा पुणे येथे संत चोखोबाराय मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मंदिर समिती सदस्यांनी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट लोणावळा येथे घेतली असता त्यांना, “तुम्ही बांधलेल्या देवळात बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा.” असे सांगून बौद्ध धंम्माचे मार्गदर्शन केले.
८ मे १९५५ – रोजी मुंबई नरेपार्क येथे भारतीय बौद्धजन समितीच्या विद्यमाने भगवान गौतम बुद्ध जयंती उत्सव श्री. मंगलदास पक्वासा, माजी राज्यपाल, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणात सांगितले की, “बुद्ध धंम्म आणि हिंदू धर्म यात जमीन आसमानाचे अंतर आहे.”
८ मे १९७२ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धंम्माची दीक्षा देणारे थोर बौद्ध भिक्षू चंद्रमणी यांस परिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत