दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

पँथर नेते यशपालजी सरवदे यांचा प्रथम स्मृतीदिन..

धाराशिव : आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी धाराशिव जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, पँथर चे झुंजार नेते, नागबोधी रिसर्च सेंटर – नागेश नगरी धाराशिव चे संस्थापक अध्यक्ष, आपल्या क्रांतिकारी धम्म चळवळीने जनमानसाच्या मनात घर करणारे लोकनेते माननीय यशपाल जी सरवदे यांना प्रथम स्मृतीदिनी विनम्र अभिवादन .

परिवाराच्या, बागबोधी रिसर्च सेंटरच्या व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूज्य भंते धम्म सार व नगबोधी रिसर्च सेंटर येथे सेंटर च्या अध्यक्ष आयु. सुषमाजी यशपाल सरवदे, केंद्रीय मंत्री मा. रामदासजी आठवले, आयु. कैलास शिंदे यांच्या हस्ते तथागत बुध्द यांच्या मूर्तीचे अनावरण तसेच पँथर यशपालजी सरवदे यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री मा. रामदासजी आठवले, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत ज. वी. पवार, मा. अविनाश महातेकर, मा. अर्जुन डांगळे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक ज्येष्ठ मान्यवरांची अभिवादन सभेस उपस्थिती राहणार आहे.

टीम दैनिक जागृत भारत च्या वतीने झुंजार पँथर ला क्रांतिकारी जयभीम आणि भावपूर्ण आदरांजली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!