मुंबईची स्वच्छता मोहीम राज्यभर राबविणार

केवळ महापालिकेचे कर्मचारी किंवा महाराष्ट्र शासनापुरतीच स्वच्छतेची मोहीम मर्यादित नसून येत्या काळात मुंबईच्या धर्तीवर ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येईल, मुंबई महापालिकेने सुरू केलेली ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ मुंबईकरांच्या उत्तम, निरोगी आरोग्यवर्धनासाठी उपयुक्त असून त्याचे दुरोगामी परिणाम नजीकच्या काळात पाहायला मिळतील. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली.
मुंबई महापालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात ३ डिसेंबरपासून दर आठवड्यातून एक दिवस संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या ‘एन’, ‘एम पश्चिम’ आणि ‘एफ उत्तर’ आदी विभागांत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शिंदे यांनी सहभाग नोंदवत संबंधित भागातील स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.
महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. घाटकोपर पश्चिमेकडील अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. प्रत्येक परिमंडळातील मनुष्यबळ स्वच्छतेसाठी एकाच विभागात एकत्र आणून सर्व रस्ते झाडूने स्वच्छ करणे, ब्रशिंग करणे, उच्च दाबाने पाणी फवारणी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. रस्ते स्वच्छतेकामी पालिका अशा प्रकारची संकल्पना पहिल्यांदाच राबवीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत