औरंगाबाद खंडपीठाची एकनाथ खडसेसह संबधितांना नोटीस; अवैध गौण खनिज उपसा प्रकरण

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ करणारा निर्णय दिला आहे. अवैध गौण खनिज उपसा प्रकरणात खडसे परिवाराला नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या जागेतून कोट्यावधींचा अवैध गौण खनिज उपसा केल्याप्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटी ने 175 कोटींचा दंड आकारला परंतु या अहवालाला स्थगिती देण्यात आली. या निर्णया विरोधात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली.
सदर याप्रकरणी न्या. रवींद्र घुगे व न्या. आर. एम. जोशी यांनी राज्य शासन, नाशिकचे विभागीय आयुक्त, जळगावचे जिल्हाधिकारी, भुसावळचे उपविभागीय अधिकारी तसेच एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे व रक्षा निखिल खडसे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता 30 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
एकनाथ खडसे परत भाजपा मध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत