महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

BARTI विरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने दाखल याचिका, मुख्य न्यायाधीश नसल्याने अन्य बेंच कडून परिक्षा स्थगितीस नकार,पुढील सुनावणी मुख्य न्यायाधीश ह्यांचे सामोर होणार…

राजेन्द्र पातोडे
प्रदेश युवा महासचिव तथा प्रदेश प्रवक्ता,
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश.

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे ह्यांनी संशोधक विद्यार्थी ह्यांचा छळ चालविला होता.बेकायदा चाळणी परीक्षा, संशोधक संख्या मर्यादित करने, फेलोशीप मंजूरी मध्ये मनमानी निकष लावणे, एम फिल विद्यार्थ्यांना कुठे तीन वर्ष कुठे पाच वर्षे फेलोशिप देणे, निवड झालेले विद्यार्थ्याचे फेलोशिप मध्ये मोठी कपात करणे, दिलेल्या पत्रावर किंवा आदेशावर ठाम न राहता निर्णय फिरविणे,ह्या अनागोंदी कारभारामुळे वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
त्याचा Filing Number 536/2024 असून Filing Date 05-01-2024 होती.CNR Number असून HCBM010009112024 त्यावर आज तातडीने सुनावणी घेण्याचा अर्ज वंचित युवा आघाडीचे प्रदेश सदस्य ऍड अफरोज मुल्ला ह्यांनी सादर केला होता.नियमित मुख्य न्यायाधीश नसल्याने आज सुनावणी मध्ये परिक्षा स्थगित करण्याची मागणी मंजूर होऊ शकली नाही.
मुख्य न्यायाधीश 8 ते 11 तारखे पर्यंत उपलब्ध नसल्याने अन्य बेंच कडून सुनावनी झाली.10 जानेवारीच्या परीक्षेला स्थगितीची मागणी मंजूर झाली नसली तरीही बार्टी मधील सचिव दर्जाच्या अधिकारी ह्यांनी सूर केलेली मनमानी आणि महासंचालक ह्यांची बेकायदा कारभार ह्यावर न्यायालयीन लढा आज पासून न्यायालयात सुरू झाला आहे.पुढील सुनावणीत मुख्य न्यायाधीश ह्यांचे पुढे जनहित याचिका सुनावणी होईल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!