महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल आयु. राजेंद्र निकाळजे यांचा सत्कार.

२१ एप्रिल २०२४ सोलापूर
सोलापूर – सोलापूर येथील समाज कल्याण हॉल मध्ये काल २० एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता मातोश्री शारदा ताई अंबादास शिंदे यांच्या स्मरणार्थ वधू वर मेळावा घेण्यात आला होता.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष व महाविहार निर्माण समिती, परांडा चे सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्रात, प्रामुख्याने धाराशीव जिल्ह्यात धम्म रुजवण्यासाठी कष्ट घेणारे परंडा येथील मा राजेंद्र निकाळजे यांचा सामाजिक व धार्मिक उल्लेखनीय कार्य केले म्हणून वसुंधरा फाउंडेशन पुणे चे प्रमुख मा फराझ इंतकाब यांनी पुणेरी पगडी व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा अंबादास शिंदे हे होते. यावेळी बोलताना राजेंद्र निकाळजे यांनी हा पुरस्कार दिला आहे हा मला विशेष वाटतो कारण विषमतेची पगडी जरी असली तरी पुरस्कार देणारे समता व बंधुत्व जपणारे आहेत ; याचा मिलाप आहे यामुळे आनंद होतो आहे असे सांगितले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक अपासिका व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!