मुंबई येथील चेंबूरमध्ये गॅससिलिंडरचा झाला स्फोट

चेंबूर कॉलनी परिसरातील एका घरात बुधवारी सकाळी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे घराच्या भिंती कोसळल्या. या दुर्घटनेत दोन महिलांसह आठजण जखमी झाले. त्यांच्यावर शीव आणि चेंबूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. विकास अंभोरे (५०), अशोक अंभोरे (२७), सविता अंभोरे (४७), रोहित अंभोरे (२९), राहुल कांबळे (३५), पार्थ सिंह (२१), मनोज निर्भवणे (५४) आणि सुनंदा निर्भवणे (४९) अशी जखमींची नावे असून यापैकी चौघांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले.
सिलिंडरच्या स्फोटात सुनंदा निर्भवणे ८० टक्के होरपळल्या असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मनोज निर्भवणे ३५ ते ४० टक्के भाजले आहेत. तसेच राहुल आणि पार्थही जखमी झाले आहेत. मनोज, राहुल आणि पार्थवर चेंबूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चेंबूर कॉलनीतील नॅशनल स्कूल परिसरातील जुन्या बॅरेकमधील एका घरात सकाळी ७.३० च्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर घराच्या भिंती आणि पहिला मजला पूर्णपणे कोसळला. त्यामुळे ढिगाऱ्याखाली सात ते आठजण घरात अडकले होते. स्थानिकांनही तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदतकार्याला सुरुवात झाली. सिलिंडरच्या स्फोटात सुनंदा निर्भवणे ८० टक्के होरपळल्या असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मनोज निर्भवणे ३५ ते ४० टक्के भाजले आहेत. तसेच राहुल आणि पार्थही जखमी झाले आहेत. मनोज, राहुल आणि पार्थवर चेंबूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत