मुख्यमंत्र्यावर टिका केल्यामूळे दत्ता दळवी अटकेत

कोकणवासीयांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचाराच्या वेळी लावण्यात आलेल्या ह्यहिंदुहृदयसम्राटह्ण या उपाधीवरून दळवी यांनी वक्तव्य केले. यावेळी अपशब्दाचाही वापर करण्यात आल्याची तक्रार भांडूप पोलिसांकडे करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आपण निर्दोष असून या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा करत दळवी यांच्याकडून जामिनाची मागणी करण्यात आली. त्यांच्या या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. दळवी यांच्या अटकेनंतर भांडूप पोलीस ठाणे परिसरात ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी खासदार संजय राऊत व आमदार सुनील राऊतही पोलीस ठाण्यात आले होते.
सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपशब्द व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडूप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी भांडूप पोलिसांनी दळवी यांना अटक केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत