अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांची घोषणा

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी काल मुंबईत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच त्यांच्या आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची घोषणा केली आहे. लवकरच सुमारे ३ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पदोन्नत्तीचा मार्ग मोकळा करुन देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केल्याचं त्यांनी सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत