महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित.

अनेक तालुक्यातील शेकडो गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मराठा समाजाने चहुकडून केलेल्या घेरेबंदीनंतर रोहित पवार यांनी बॅकफूटवर येऊन यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यात्रा स्थगित केली नाहीतर मराठा समाज त्यांची यात्रा बंद पाडेन, अशी धमकीच मराठा आंदोलक योगेश केदार यांनी दिली होती. तसेच इतरही आंदोलकांनी रोहित पवार यांना यात्रा बंद करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन यात्रा स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी घेतलाय.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत