मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; सरकारकडून शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी…शिंदे समितीला सरकारकडून 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी शिंदे समितीला अहवाल देण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र तेलंगणामध्ये सध्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे तेलंगणामधून मूळ कागदपत्र मिळण्यास विलंब होत आहे. त्याचमुळे सरकारकडून शिंदे समितीला ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठा समाज आणि कुणबी दाखले यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या कागदपत्रांसाठी विलंब होतोय. त्यामुळे मराठा आरक्षण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा हा आधी निजामशाही राजवटीचा भाग होता. त्यामुळे निजाम स्टेटचे सगळे मूळ डॉक्युमेंट्स हे तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी आहेत. या कागदपत्रांच्या आधारे शिंदे समिती आपला अहवाल सादर करणार आहे. पण तेलंगणामध्ये सध्या विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे तिथली प्रशासकीय यंत्रणा ही या निवडणूक प्रक्रियेत गुंतलेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाबाबतची कागदपत्र उपलब्ध होण्यास थोडा विलंब लागतो आहे. ते पाहता राज्य सरकारकडून शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहेc
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत