मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांची खासदारकी रद्द करून कारवाईची मागणी.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावले. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवले असून त्यांच्याव अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी टीका करत थेट राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर खासदार हेमंत पाटलांवर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतः डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांडारवाड यांनी ही माहिती दिली,

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडच्या अधिष्ठातांबरोबर खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तवणुकीसंदर्भात सेंन्ट्रल मार्ड आक्रमक झाले आहे खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डाॅक्टर्स महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. घडलेल्या प्रकारामुळे फक्त अधिष्ठाता यांचे मानसिक खच्चीकरण झालेले नाही तर संपूर्ण डॉक्टरांसाठी अपमानास्पद गोष्ट आहे. हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा मार्डकडून देण्यात आला आहे. सोबतच राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास सरकार जबाबदार राहणार, अशी भूमिका सेंट्र्ल मार्डनं घेतली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!