सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. ऐन महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आल्याने राष्ट्रवादीचं पुण्यातील बळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारमधील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार तसेच जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचे खोळंबलेले वाटप यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
सुधारित यादीमध्ये अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. तर पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अकोला, दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे बुलढाणा, हसन मुश्रिफ यांच्याकडे कोल्हापूर, धनंजय मुंडे यांच्याकडे बीड, अनिल पाटील यांच्याकडे नंदूरबार जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.
सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत