देश-विदेशमुख्यपान

केरळ बीचवर आढळला व्हेल माशाचा मृतदेह

केरळ राज्यातील कोझिकोडच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर एक भलामोठा मेलेला व्हेल मासा पाण्यातून वाहत आल्याचं पाहायला मिळालं आहे. व्हेल माशाचं शव समुद्रातून वाहून समुद्रकिनारी पोहोचल्याचं बोललं जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर इतका मोठा व्हेल दिसल्यानंतर तेथे लोकांनी मोठी गर्दी केली. एवढा मोठा व्हेल मासा समुद्रकिनारी कसा आला? हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
सर्वप्रथम काही स्थानिक मच्छिमारांना सकाळी 10:15 च्या सुमारास हा व्हेल मासा मृत अवस्थेत दिसला. एका मच्छिमाराने सांगितलं की, हा मेलेला मासा पाहिल्यानंतर तो दोन दिवसांहून जास्त दिवस मेल्याची शक्यता आहे. कारण मासा सडण्यास सुरुवात झाली होती. तसेच या व्हेलचं शरीर 15 मीटर म्हणजेच जवळपास 50 फूट लांब असल्याचंही सांगण्यात येत आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कोझिकोड कॉर्पोरेशनचे प्रभारी आरोग्य अधिकारी प्रमोद यांनी सांगितलं की, मृत्यूचं कारण शोधण्यासाठी व्हेलचे पोस्टमॉर्टम समुद्रकिनाऱ्यावरच केलं जाईल. शवविच्छेदनानंतर प्रोटोकॉलनुसार माशाला खड्ड्यात पुरण्यात येईल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!