मुख्यपानमुंबई/कोंकण
बस डेपोजवळील भंगार गोदामाला लागली भीषण आग

दि.28. मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील कुर्ला येथील एका गोडाऊनला भीषण आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत