मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

एस आर पी एफ चे सहाय्यक फौजदार पोपट फकिरा वाघमारे यांचे दुःखद निधन

त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मुळ गावी आरळी [ खुर्द ] ता तुळजापूर येथे करण्यात आला

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

छत्रपती शिवाजी महाराज , फुले शाहु , आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बौद्ध संस्कारांचे महत्त्व सांगणारे व गाडे अभ्यासक [ S R P F ] एस आर पी एफ बल गट क्रमांक ८ मुंबई चे सहाय्यक फौजदार पोपट फकिरा वाघमारे यांचे नोकरीवर आसताना अचानक पणे दुःखद निधन झाले
त्यांची राज्य राखीव पोलीस बला मध्ये दि १८ मे १९८५ ला ते भरती झाले त्यांनी आज तागायत तब्बल ३९ वर्ष दिर्घ काळ मुंबई करांची खुप चांगल्या पद्धतीने सेवा केली आणि कामगीरी ही बजावली त्यांना नोकरी करत त्यांना वाचनाचा खुप छंद होता एक सयंमी शांत पोलीस अधिकारी म्हणून ते कार्यरत होते त्यांची सेवानिवृत्तीची तारीख ३१ मार्च २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली होती परंतू अचानक पणे दि ०५ जुलै २०२४ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने आरळी गावावर व [ S R P F ] एस आर पी एफ कॅम्पावर शोककळा पसरली होती त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मुळ राहात्या गावी आरळी [ खुर्द ] ता तुळजापूर जि धाराशिव येथे दि ०६ / जुलै २०२४ रोजी करण्यात आला .
त्यांच्या पाश्चात विद्यादेवी पोपट वाघमारे पत्नी, स्वप्नील पोपट वाघमारे मुलगा , शिवानी पोपट वाघमारे मुलगी , माही पोपट वाघमारे मुलगी व नातवंड आसा मोठा परिवार आहे .
त्यांचा अंत्यविधि सार्वजनिक स्मशान भूमीत करण्यात आला .
यावेळी गावातील व परिसरातील नातेवाईक बौद्ध उपासक व उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!