प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

मुसळधार पावसाचा इशारा! कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील बुलडाणा, वाशिम, अकोला, नागपूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, राज्यातील 5 ते 6 जिल्हे वगळता राज्यभरात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यातही आज यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.तर सुकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर राज्यात काही भागात पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अमरावती जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!