देश-विदेशमहाराष्ट्र

आज मोठा दिवस! चांद्रयान जागं होणार.

चांद्रयान-3 मिशनच भविष्य आज निश्चित होईल. हे मिशन पूर्णपणे यशस्वी ठरलय. पण भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO पुन्हा एकदा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागं करण्याचा प्रयत्न करतील. आता विक्रम आणि प्रज्ञानकडून जी काही अतिरिक्त माहिती मिळेल, ती मिशनसाठी बोनस असेल. ISRO ला आता फक्त कमांड द्यायची आहे. शिवशक्ती पॉइंटवर भारताचा लँडर आणि रोव्हर जिथे आहे, तिथे 20 सप्टेंबरलाच सूर्य प्रकाश पोहोचला आहे. आता ISRO सिग्नल पाठवेल. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आज आपल्या लँडर आणि रोव्हरला वेकअप सिग्नल पाठवेल. दोन दिवसांपासून चंद्रावर सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे आता विक्रम आणि प्रज्ञानमधील सोलार पॅनलच्या बॅट्री फुल चार्ज झाल्या असतील अशी अपेक्षा आहे.

20 सप्टेंबरला सूर्यप्रकाश झाला असला, तरी दोन दिवसांनी कमांड देण्यात येणार आहे. सगळी काही जुळून आलं, सिग्नल यशस्वीपणे पोहोचला, तर भारताला आणखी पुढचे 10-12 दिवस चंद्रावरील माहिती गोळा करता येईल. भारतासाठी ही बोनस माहिती असेल. पुढच्या मिशनसाठी त्याचा उपयोग होईल.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्रीच्यावेळी तापमान -238 डिग्री असतं. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमधील उपकरण इतकं कमी तापमान सहन करुन टिकून राहू शकतात का? ते समजेल. असं झाल्यास ती निश्चित एक मोठी बाब असेल. लँडर आणि रोव्हरसाठी ज्या कंपन्यांनी उपकरण बनवलीयत, त्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी येऊ शकते. रोव्हर आणि लँडरने इस्रोचे सिग्नल पकडले पाहिजेत. जर या सिग्नलसना प्रतिसाद मिळाला नाही, तर चांद्रयान-3 मिशन इथेच संपून जाईल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!