महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

खंडणी प्रकरणी महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. तेव्हापासून महेश गायकवाड हे चर्चेत होते.

महिन्याभराच्या उपचारानंतर महेश गायकवाड घरी परतले होते. मात्र आता एका बांधकाम व्यावसायिकाने खंडणी मागितल्याचा आरोप करत महेश गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करत उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी इथल्या चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले आहेत. तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने गायकवाड यांच्यावर गावकऱ्यांच्या मदतीने अंबरनाथ तालुक्यातील त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

दोन महिन्यात जमिनीच्या प्रकरणात महेश गायकडवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्याचत दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!