महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

क्रातंकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र तर्फे राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरकार सोहळा संपन्न…

प्रतिनिधी, क्रांतिकारी शिक्षक संघटना(म.रा)च्या वतीने 5 वे आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन नीलकमल हॉटेल,बीड येथे 7 जानेवारी 2024 रोजी मान्यवरांच्या हस्ते यशस्वीरित्या संपन्न झाला,या राज्य स्तरीय कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा.मंत्री.जयदत्तजी क्षीरसागर साहेब (अण्णासाहेब), मा.राज्य सचिव श्री.शाहेद कादरी सर,मा.नरेंद्र काळे सर (सिनेट सदस्य-डॉ.बा.आ.म.वि.) मा.श्री. श्रीकांत कुलकर्णी साहेब (शिक्षणधिकारी),सौ.शीतलताई पाखरे (सरपंच),श्री.हाफिज शेख मोईनुद्दीन (शहर काझी वक्फ बोर्ड व समाज सेवक)श्री.विजय सरवदे(सभापती-शिरुर का)मा.सतीश वाघमारे,हनुमंत चव्हण,शफी इनामदार,कादरी अय्युब,सय्यद मुस्तफा,खान अदनान,इम्रान कादरी, काजी माजेद, मान्यवर उपस्थित राहिले.मा.मंत्री.जयदत्तजी क्षीरसागर साहेब (अण्णासाहेब) यांनी आपल्या मनोगतात क्रांतिकारी शिक्षक संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात ही संघटन यशस्वी करण्यासाठी योगदान दिले जाईल,तुम्ही शैक्षणिक व सामाजिक कार्य करत रहावे,ही अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री.शाहेद कादरी सर यांनी शिक्षक समस्या व संघटनेने केलेले सामाजिक व शैक्षणिक कार्य या बाबत माहिती दिली, तसेच क्रांतिकारी शिक्षक संघटना ही सर्व सामान्य शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना सोबत घेऊन समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहिले अशी भावना व्यक्त केली. श्री.नरेंद्र काळे सर यांनी सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाना भविष्यात ही गुणवत्ता आणि सामाजिक समरसता निर्माण करण्यात योगदान देत राहावे ही अपेक्षा व्यक्त केली. या राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील 18 जिल्हातून शिक्षक बांधव व भगिनी उपस्थित राहिले.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपल्या मनोगतात भावनिक होऊन क्रांतिकारी शिक्षक संघटनेने केलेल्या गौरवाबाबत आभार व विद्यार्थीप्रति समर्पण भावना व्यक्त केली. या कार्यक्रम चे संयोजक श्री.डॉ. शशिकांत गायकवाड सर. श्री.शेख समीर इनामदार सर,श्री.असरार खान सर, श्री युनूस पटेल सर, श्री.गौस् सर, श्री.फजल सर, श्री. जावेद सर,श्री.रगीब सर, श्री.जाफर सर, श्री.सय्यद सर, श्री. मुफ्ती तावक्कल सर,श्री अजीज सर श्री कादरी परवेज,इसहाक सर,माळी संतोष,अशाद सर कामील सर….सर्व क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे पदाधीकरी व कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!