आर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

अदानीवर कोर्टात आरोप ठेवण्यापूर्वी FBI आणि इतर तपास संस्थानी संपूर्ण प्रकरणाची खोलवर चौकशी केलीय.

अदानीवर कोर्टात आरोप ठेवण्यापूर्वी FBI आणि इतर तपास संस्थानी संपूर्ण प्रकरणाची खोलवर चौकशी केलीय. सगळे पुरावे मिळवले आणि जुळवले. अडाणीच्या भाच्याच्या फोंनमध्ये खूप नोंदी सापडल्यात. फ़ोन जप्त केलाय.

या कामी पोलिसांनी फाइव्ह आईजचीही मदत घेतलीय.
वारंट निघाल्यावर अडाणीला आता अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथे फिरता येणार नाही. वारंट इंटरपोलकडे गेल्यावर अडाणीला खुलं फिरणे अशक्य होईल.
गुन्हेगार हस्तानतरण करार आहे आपला अमेरिकेशी.

केनियाने अदानीशी झालेला करार रद्द केलाय, श्रीलंकेने चौकशी सुरू केलीय, बांगला देशदेखील चौकशी करत आहे, कदाचित ऑस्ट्रेलियातून देखील कोळसा व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी पुढं येईल.
अडाणीने अनेक परदेशीं वित्तसंस्थाकडून कर्ज घेतलंय. त्या संस्था वसुलीसाठी तगादा लावतील.
शिवाय नवे कर्ज उभे करणे अशक्य होइल.

ग्रीन एनर्जी प्रोजेक्त अदानी भारतात उभा करणार होता.
हा केंद्राच्या धोरणाकुल आणि त्याच्याच योजनाशी सुसंगत होता. त्याची व्याप्ती बहुतेक सर्व राज्यात राहणार होती. पण अनेक राज्यांनी वीज दर महाग आहेत, म्हणून नकार दिला.
तेव्हा राज्यांना लाच दिली गेली.. एकट्या आंध्रला 1700 कोटी लाच म्हणून दिले गेले.

या प्रोजेक्तसाठी अडाणीने 2200कोटी डॉलर्स चा फंड अमेरिकन लोक आणि तेथील वित्तसंस्था मार्फत गोळा केला. लाच म्हणून जे पैसे दिले, ते या 2200 कोटी मधून!
त्याच्या नोंदी आहेत!

लाच देऊन उभा राहणारा प्रोजेक्त… असं चित्र उभं राहताच तपास संस्था सावध झाल्या…
कारण, उद्या प्रोजेक्त बुडाला तर अमेरिकन लोकांचे पैसे बुडतील,…! कारण, तो लाच देऊन उभा राहणार आहे!
अमेरिकन सरकारच्या दृष्टीने तो फ्रॉड होतो!

आपल्या नागरिकांचे नुकसान अमेरिका मान्य करत नाही!


Madan Patil FB

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!