४०/४५ टक्के मतदार मताधिकार पासून दूर का राहतात?
कालची राज्यातील मतांची टक्के वारी पाहिल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मतदानापासून दूर का राहत असावेत हा प्रश्न पडला. एकतर राजकारणी लोकांवर यांचा विश्वास नसावा ,आणि राहिलच कसा ?राज्यातील राजकारणाची पातळी एवढी घसरली की उमेदवार कामावर ,विकासावर बोलण्या ऐवजी वेक्तीगत जहरी टीका करायला लागले.फोडाफोडीचे राजकारण , पक्षातंतर,भ्रष्टाचार पाहून मतदार केंद्रात ते जातीलच कशाला? निवडणूक आयोगाने करोडो रुपये जाहिरातीवर खर्च केले ,का तर लोकांनी मतदानाला बाहेर पडावे म्हणून.
दुसरे कारण असावे EVM वर विश्वास नसल्या कारणाने.सुप्रीम कोर्ट EVM संदर्भात निर्णय देताना EVM वरील आक्षेप विचारात घेऊन त्यांनी प्रतेक बुथवर VVPAT बॉक्स लावण्याचे आदेश दिले.पण त्या बॉक्स मधील चीठ्या मोजल्यावर ,मशीन आणि बॉक्स मधील मतांमध्ये तफावत आली तर ?😱…म्हणून VVPAT बॉक्स मधील चीठ्या मोजल्या जात नाहीत.निवडणूक आयोगाने मतदार केंद्रावर प्रतेक मतदार केंद्रात प्रतेक पक्षाचे एक एक मडके ठेवावे आणि लोकांना सांगावे जो पक्ष आवडत नाही त्या पक्षाच्या मडक्यात थुकावे असे सांगितले तर अर्ध्या तासात सर्व मडके थुकिने भारतील एवढी चीड आहे लोकांच्यात😡😡😡
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत