महाराष्ट्रमुख्यपान

तापी नदीवरील सारंगखेडा पुलावर मोठं भगदाड.

सारंगखेडा येथील तापी नदीवर ब्रिटिश कालीन पूल बांधण्यात आला होता. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून तापी नदीला मोठा पूर आला. यादरम्यान तापी नदीवरील पुलावर मोठं भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्थळी प्रशासन व पोलीस दाखल झाले असून दोंडाईचा बाजूने पुलाच्या येणाऱ्या भागातील भरावा वाहून गेल्याने पुलाला भगदाड पडले आहे. घटनास्थळी शहादा तहसीलदार व पोलीस प्रशासनाने धाव घेतली असून पुलावरील वाहतूक बंद केली आहे.
सध्या तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने पुर परिस्थीती निर्माण झाली. तापी नदीच्या काठच्या गावाने नंदुरबार प्रशासनाने सतर्कतेच्या इशारा दिला आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने तापी नदी धोक्याच्या पातळी ओलांडल्याचे चिन्ह दिसून येत आहे. 111 मीटर तापी नदीची धोक्याची पातळी आहे, सध्या 110 मीटर पर्यंत तापी नदीची पातळी सुरू आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!