मुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

मराठी असल्यानं ऑफिससाठी जागा नाकारली?

दि.28. मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता पुत्रावर अखेर मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे. तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरुन मुलुंड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रवीण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर अशी या पिता पुत्राची नावं आहेत.

मुलुंड पश्चिममध्ये ऑफिससाठी घर पाहायला गेल्यानंतर आपल्याला मराठी असल्याचं सांगत घर नाकारल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर यांनी केला होता. याबाबत सोशल मीडियावर त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला होता आणि तो प्रचंड व्हायरल झाला. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
या सगळ्या प्रकारावर मनसे नेते संदीप नेते यांनीही टीका केली आहे. “केम छो वरळी” होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हटतात ह्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!