
संपूर्ण गाझा पट्टीतीलल नागरिकांसाठी पूर्ण,जलद,सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय मदत पोचवण्याची आणि त्यासाठी योग्य मार्ग उपलब्ध करण्याची तातडीची गरज असल्याचं या ठरावात नमूद करण्यात आलं आहे. गाझामध्ये मानवी मदत वाढण्याबाबतचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं काल मंजूर केला. या ठरावाच्या बाजूनं तेरा मतं पडली, तर अमेरिका आणि रशिया मतदानापासून दूर राहिले.तत्पूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉक्टर टेड्रोस घेब्रेयेसस यांनी गाझामध्ये अपुऱ्या अन्नपुरवठ्यामुळे होत असलेल्या दुष्परिणामांबाबत इशारा दिला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत