जाहिरातीमुख्यपानशैक्षणिक

सीबीएसईच्या १०वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात . या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होणार असून १० एप्रिलपर्यंत चालणार आहेत. जवळपास ५५ दिवस या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांची डेटशीट जारी करताना सीबीएसईने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

दोन विषयांमध्ये पुरेसे अंतर असावे, इयत्ता 12वीची डेटशीट तयार करताना जेईई मेन परीक्षा लक्षात ठेवली आहे. हे टाईमटेबल तयार करताना दोन विषयांच्या परीक्षा एकाच तारखेला होऊ नयेत, हे देखील ध्यानात ठेवण्यात आले आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10:30 पासून असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची चांगली तयारी करता यावी यासाठी परीक्षेच्या दोन महिने आधी डेटशीट जारी करण्यात आली आहे.
दहावी, बारावी परीक्षांचे टाईमटेबल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!