मुख्यपानमुंबई/कोंकण

एक खाजगी विमान मुंबई विमानतळावर क्रॅश झाले ; 8 प्रवासी या अपघात ग्रस्त

प्रायव्हेटमधून प्रवास करत मुंबई विमानतळावरच लँडिंगच्या वेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. खाजगी विमान मुंबई विमानतळावर क्रॅश झाले आहे यामध्ये 8 प्रवासी या अपघात ग्रस्त झाले आहेत.

खराब हवामानामुळं विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, विमान अपघात होताच विमानतळावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई विमानतळावरुन विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आले.

VSR Ventures Learjet 45 हे विमान अपघातग्रस्त झाले आहे. VT-DBL ऑपरेटिंग फ्लाइट विशाखापट्टणम ते मुंबई असे उड्डाण करत होते. हे विमान मुंबई विमानतळावर धावपट्टी क्रमांक 27 वर उतरत असताना हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर हे विमान कोसळले. विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स एकूण 8 जण प्रवास करत होते. विमान लँडिंग करत असताना अतिवृष्टीसह दृश्यता 700 मीटर होती. यामुळे खराब हवामानामुळेच विमान कोसळ्याची माहिती समोर येते. आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती डीजीसीए कडून देण्यात आलेय.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!