हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसिम आज़मी साहेब यांचा सत्कार!

उर्दू माध्यमाच्या आरक्षित रिक्त पदांवर उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्यांच्या त्या जागा खुल्या प्रवर्गातून त्वरित भरण्यात याव्यात, तसेच उर्दू माध्यमाच्या शाळांवर उर्दू माध्यमाच्याच शिक्षकांची भरती करण्यात यावी अशी मागणी आपण येत्या पावसाळी अधिवेशनात करावी अशी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनची विनंती…
औरंगाबाद: हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा. श्री. अबू आसीम आज़मी साहेब यांची भेट घेतली तसेच हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या परंपरेनुसार शाल आणि पुस्तक देऊन सत्कार केला तसेच त्यांच्या सोबत उर्दू शिक्षक भरती, आरक्षित रिक्त पदांवर उमेदवार उपलब्ध न झाल्याने त्या जागेवर खुल्या प्रवर्गातून त्वरित भरण्यात यावी कारण त्या जागा रिक्त राहू नये.तसेच उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये फक्त उर्दू माध्यमाच्याच शिक्षकांची भरती करण्यात यावी या करीता आपण येत्या पावसाळी अधिवेशनात हे प्रश्न मांडून उर्दू माध्यमाचे विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना न्याय द्यावा ही विनंती करण्यात आली. यावर आमदार अबू आसिम आज़मी साहेब यांनी सांगितले की नक्की हे दोन्हीही मुद्दे मी अधिवेशनात मांडणार आणि आपला नंबर माझ्या PA ला द्यावा की जेणेकरून मी आपल्याशी संपर्क करेल. यावेळी माझे मित्र तसेच समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष फैसल खान आदींची उपस्थिती होती…
????????धन्यवाद साहेब!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत