महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

आंतरराष्ट्रीय दर्जाची दीक्षाभूमी नागपूर,असतानाही ७० वर्षापासुन मालकी हक्काने ७/१२का झाला नाही?

विनोद खोब्रागडे


दीक्षाभुमी नागपूर जमीनीचा ७/१२ नझुल भूमापन अधिकारी नागपूर यांनी २०१७ मध्ये शेती दाखवून डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या नावाने प्रापर्डी कार्ड नंबर १२६५,१२६७,वर आणि ७/१२ वर नाव चढविलेच कसे?????
उघडा डोळे बघा नीट
मा.उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्वाचन क्षेत्रात,उप राजधानी नागपूर शहरात महसूल अधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार उघड???????
दीक्षाभुमी नागपूर या जागेचा मालक भोगवटदार म्हणून ७/१२वर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला नझुल भूमापन अधिकारी यांनी २०१७ मध्ये कसे केले??????

दीक्षाभुमी नागपूर ला २०१७ मध्ये नझुल भूमापन अधिकारी शेती दाखवितात,तर महसूल अधिकारी तहसीलदार झुडपी जंगल दाखवितात,
व ७/१२ वर मालक डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला दाखवितात,हा काय प्रकार सुरू आहे??? यांचे डोके ठिकाणावर आहे काय????

माननीय मंत्री महोदय आपण विशेष लक्ष द्यावे व दीक्षाभूमी नागपूर तात्काळ भोगवटदार म्हणून मालकी हक्काने नावाने करन्यासाठी निर्देश द्यावेत
मी संपूर्ण दस्तऐवज सह देवगिरी बंगल्यावर आपल्या कार्यालयात विनंती अर्ज केलो आहे

विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार साहेब यांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरावे

माननीय खासदार चंद्रशेखर आझाद रावन व इतर खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी सुद्धा हा आंतरराष्ट्रीय मुद्दा संसदेमध्ये लावून धरावे

दीक्षाभूमी नागपूर मालकी हक्काने ७/१२करन्यासाठी , माननीय उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ आदेश पारित करून निर्देश महसूल अधिकारी यांना देन्यासाठी विनंती अर्ज सादर केला आहे
*
✍️”दीक्षाभुमी” नागपूर चा ७/१२ व प्रापर्डी कार्ड डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला (कृषी महाविद्यालय नागपूर) यांचा नावाने केलाच कसा???????

मी.चंद्रपूर, नागपूर, मुंबई, दिल्लीत, पत्रकार परिषद घेऊन शासन, प्रशासन, यांना जाब विचारनार आहेच, परंतु आंबेडकरी समाज बांधवांनी सुद्धा जाब विचारावे,?????

दीक्षाभुमी नागपूर भोगवटदार मालक ७/१२वर करन्यासाठी, आंबेडकरी समाज बांधवांनी जन आंदोलन उभे करावे

विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा दीक्षाभूमी नागपूर जमीनीचा खसरा नंबर ७० वर्षांनंतर,शोधून समाजाला पहिल्यादां सांगणारे, लोकसेवक तलाठी/पटवारी वरोरा चंद्रपूर यांचा रोखठोक सवाल????
लोक बोलत नाही म्हणून अन्याय होतो असे सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात
आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही,हे प्रशासनाने लक्षात घ्यावे

दीक्षाभुमी नागपूर चां ७/१२ डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना ९९वर्षाचा लिजवर दिलाच कसा?????

दीक्षाभुमी नागपूर ची २२ एकर जमीन पैकी ११ एकर शेती डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा नावाने नझुल भूमापन अधिकारी यांनी दिनांक २९/०३/२०१७ मध्ये फेरफार क्रमांक ८४०५ नुसार प्रापर्डी कार्ड नंबर १२६५,१२६७, मध्ये दाखविले कसे?????

दीक्षाभुमी नागपूर चां २२ एकर जमिनीला तहसीलदार नागपूर यांनी रा.मा. क्र.०४/आर.टी.एस.६४/२०१८-२०१९ आदेश दिनांक १६/०१/२०१९ मध्ये झुडपी जंगल, सडक, रस्ते, इमारत पड, असे दाखवून एका दिवशी फेरफार क्रमांक ५०२१,५०३८,घेऊन, नोटीस ची तारीख नाही, फेरफार घेतल्याची तारीख नाही, माहिती मिळाल्याची तारीख नाही, आदेशाचे संदर्भ नाही,असे बोगस फेरफार
तेंव्हाच मंजूर केले कसे?????

हे सर्व पुरावे दस्तऐवज इंटरनेट वर डिजिटल साक्षरीसह उपलब्ध आहेत, तुम्ही महाराष्ट्रातुन, भारतातुन कुठूनही पैसे भरून घेऊ शकता, तलाठी, कडे जान्याची आवश्यकता नाही

काय महसूल अधिकारी व नझुल भूमापन अधिकारी, नशा पाणी करून, डोळे बंद करून, आदेश करून फेरफार घेऊन प्रमानीत केले आहे काय????????

असे बोगस फेरफार महाराष्ट्रात, भारतात कुठेही होत नाही, ते नागपूर शहरात होत आहेत,हे दीक्षाभूमी नागपूर वरून उघडकीस आले

विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी नागपूर, उपविभागीय अधिकारी नागपूर यांचे मुळीच लक्ष नाही,???????????? चुपचाप पाहत आहेत

माननीय उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र शासन आपण विशेष लक्ष द्यावे,व ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केले अशा भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या वर तात्काळ फौजदारी कारवाई करावी
विरोधी पक्षनेते यांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरावे

मा.खासदार यांनी दीक्षाभूमी चां मुद्दा संसदेमध्ये पहिल्या प्रथम ठेवावे व चर्चा करून लाखो करोडो आंबेडकरी समाज बांधवांना न्याय व हक्क दीक्षाभूमी नागपूर नावाने करुन देन्यासाठी मदत करावी धन्यवाद ????
पुरावे दस्तऐवज मी पाठवित आहे
जनहितार्थ जारी
समाजहितासाठी
देशहितासाठी
राष्ट्रबांधनीसाठी
लोकशाही वाचवण्यासाठी
संविधान संरक्षणासाठी
दीक्षाभुमी नागपूर संरक्षणासाठी
लोकप्रतिनिधी यांनी दीक्षाभूमी नागपूर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जन आंदोलन उभे करावे

हि पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात भारतात वायरल करावे उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे माननीय खासदार रावन पर्यंत गेली पाहिजे व तमाम खासदार पर्यंत पोहचवावे जने करुन संसद मध्ये आवाज बुलंद होइल व न्याय मिळेल धन्यवाद

अपीलार्थी
विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा दीक्षाभूमी नागपूर चां ७/१२चा शोध लावुन समाजाला सांगणारे, लोकसेवक तलाठी/पटवारी वरोरा चंद्रपूर
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!