अभिनेता रणबीर कपूरला ईडीचं समन्स.
मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅप प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले. त्याला ६ ऑक्टोबर रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात एक साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
रणबीरने समाजमाध्यमांवर या अॅपसाठी जाहिरात केल्याची माहिती ईडीच्या तपासात उघड झाली आहे. त्याच्यासह १२ हून अधिक कलाकार, खेळाडूंनी महादेव अॅपसाठी समाजमाध्यमांवर जाहिरात केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांचेही लवकरच जबाब नोंदवण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जाहिरातीसाठी सर्वाधिक रक्कम रणबीरला मिळाल्याचा ईडीला संशय आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत