गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची गरज

भास्कर वाघमारे
डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम च्या वतीने गुणवंताचा गुणगौरव सोहळा संपन्न
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
भारताच्या इतिहासातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये तत्त्वज्ञानी विज्ञानाच्या माध्यामातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये खुप मोठे बदल घडून आले विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये व मानव जातीच्या उद्धारासाठी शिक्षणाची किती गरज आहे हे बदल घडविणे आजच्या काळाची गरज आहे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावा म्हणून शिक्षणाची संस्कृती जपली पाहिजे शिक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता व वैचारिकता हे सर्व साधारणपणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि कल्याणासाठी डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल चा उगम झाला आणि विद्यार्थी ही घडत गेला अशीच परिस्थिती आज ही आहे केंद्रात पहिला आणि दुसरा विद्यार्थी हा डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियमचा आहे त्यामुळे सार्थ अभिमान आहे त्यामुळे विद्यार्थीच्या गुणवत्ता प्राप्तीसाठी दर्जेदार शिक्षणाची गरज भासते आणि ते डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मेडियम स्कुल मध्ये आहे असे प्रतिपादन भास्कर वाघमारे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले
नळदुर्ग येथे डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस ते बोलत होते
प्रथमता रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून
संजय चिनगुंडे खय्युम मनियार तुकाराम कुंभार हे होते
प्रथमता डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवे यांचा दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांवर शिक्षका वरती करडी नजर ठेवून शिक्षणाची बाजू मजबूत करणारे पहिले संस्थापक म्हणून त्यांचा पालकांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी अनेक शिक्षकाने आपले मनोगत व्यक्त केले .
जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग येथे प्रशालेत 88 %टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्याने प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे हिचा डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सर्व गुणवत्ता प्राथमिक विद्यार्थ्यांचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता पाटील सर्व गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार केला कार्यक्रमाचे आयोजन डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम च्या वतीने करण्यात आले होते यावेळी सर्व शिक्षक पालक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत