क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे स्मृतिदिन

✹ १७ फेब्रुवारी ✹

जन्म – १४ नोव्हेंबर १७९४ (पेठ,पुरंदर)
स्मृती – १७ फेब्रुवारी १८८१ (खेड,पुणे)
देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती वीर लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७७४ रोजी झाला. त्यांचे पूर्वज हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे होते. त्यांना लहानपणीच आपल्या वडिलांकडून शस्त्रविद्येचे शिक्षण मिळाले होते. घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, भाला फेकणे यात ते निपुण होते. पुण्यात बुधवारपेठेतील गंजपेठेत त्यांची तालीम आहे. याच तालमी मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले व दिले. १८१७ मध्ये झालेल्या घनघोर युद्धात इंग्रज सेनेने मराठी सैन्याचा पराभव केला.
या लढाई मध्ये लहुजींचे वडील राघोजी मारले गेले. स्वातंत्र्यासाठी वडिलांचे बलिदान पाहून लहुजी पेटून उठले. पुणे इंग्रजांच्या ताब्यात गेले. शनिवारवाड्यावरचे भगवे निशाण उतरवून युनियन जॅक चढवला गेला. त्याच वेळी लहुजी साळवे यांनी इंग्रजांचा बदला घेण्याचे ठरवले होते. पुणे येथील बजाज कंपनी समोर लहुजींच्या वडिलांची समाधी आहे. लहुजींनी संपूर्ण युद्धशास्त्राचे ज्ञान अवगत केल्या नंतर गंजपेठेतील व्यायाम शाळेत देशप्रेमाने भारावलेल्या तरुणांना ते शस्त्रविद्येचे प्रशिक्षण देत व मार्गदर्शन करीत असत. आपले संपूर्ण आयुष्य खर्चून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढवय्यांची संघटना लहुजींनी उभी केली होती. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनीच प्रशिक्षित केलेले तरुण अधिक होते. त्यांच्या या महान कार्याला तोड नाही. अशा या थोर क्रांतिगुरूस कोटी कोटी प्रणाम.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत