कौठूळी गावचे सुपुत्र, माणदेशी हिरा, मा.डॉ.डी.एस.सावंत सर यांचा जेजेटीयू मधून “पीएचडी इन लॉ” ही डिग्री संपादन केल्याबद्दल समाजाच्या वतीने सत्कार

कौठूळी/आटपाडी – ०७ /०४/ २०२४ आटपाडी तालुक्यातील शान, माणदेशी हिरा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर श्रद्धा ठेऊन” मोक्याच्या जागा पटकावा, राजकर्ती जमात व्हा” या स्वप्न पूर्तीसाठी संघर्ष करणारे, कौठुळी जिल्हा परिषद शाळा चे माजी विद्यार्थी, अतिशय खडतर परिस्थिती वर मात केलेले व सर्व जबाबदाऱ्या सांभाळत अथक परिश्रमातून असाधारण अशा शैक्षणिक व कायदेविषयक पदव्या मिळवल्या बद्दल आदरणीय डॉ. डी एस सावंत सर यांचा सर्व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापू) खरात यांच्या हस्ते फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात सत्कार प्रसंगी म्हणाले की, डी एस सावंत सर यांनी आपल्या कौठूळी गावचे नाव उंचावले आहे. छोट्याशा गावामधील एक मागासवर्गीय समाजातील व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर पोहचला ही खूप अभिमानाची बाब आहे. आपल्या या सर्व डिग्री पाहून आपल्या गावातील युवकांना शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये ही सावंत सरांचे खूप चांगले काम आहे. आटपाडी तालुक्यांमध्ये ही सरांनी लक्ष केंद्रित करावे व नवीन युवकांना मार्गदर्शन करावे अशी विनंती यावेळी सर्वांच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केली.
प्राध्यापक डॉ. रामदास नाईक नवरे सर, सुरेश मोटे सर, रणजीत ऐवळे, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आटपाडी तालुक्यातील जनतेच्या वतीने सावंत सरांच्या शैक्षणिक यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
शेवटी डी एस सावंत सरांनी आपल्या भाषणात लहानपणापासून त्यांनी घेतलेले शिक्षण व नोकरीसाठी केलेला संघर्ष, सामाजिक जीवनामधला खडतर प्रवास याबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या. या यशाचे श्रेय देणारा ते म्हणाले की, आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणामुळे इथपर्यंत पोहचलो आहे. इथून पुढेही सामाजिक शैक्षणिक सर्वच गोष्टींमध्ये आपण मोठ्या ताकतीने सहभागी होणार असल्याचे यावेळेस स्पष्ट केले.
शेवटी जनार्दन मोटे सर यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ लक्ष्मण मोटे साहेब, गोविंद जावीर, शरद वाघमारे, विलास धांडोरे,स्वप्निल बाबर, सागर जावीर राहुल जावीर बाळू सावंत, यांचे सह कौळूळी गावचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसिद्ध करिता
विशाल दादा काटे
सोशल मीडिया आयटी सेल
सांगली जिल्हाध्यक्ष
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)
संपर्क क्र.9503873893
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत