
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीतल्या उत्पादनापेक्षा ७८० अब्ज युनिट्सने अधिक उत्पादन झालं असं कोळसा मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.कोळशावर चालणाऱ्या औष्णिक वीज उत्पादनात ८ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. मात्र या कालावधीत कोळशाची आयात ४४ टक्क्यांनी घसरली असून आयात कोळशावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २७ मेट्रीक टन कोळसा आयात झाला तर यंदा १५ मेट्रीक टन कोळसा आयात झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत