75 व्या वर्षी लालूंचा हुंकार, इंडिया आघाडीच्या पहिल्याच रॅलीला 15 लाखांची गर्दी

लोकसभा निवडणूक
75 व्या वर्षी लालूंचा हुंकार… ना गाजावाजा, ना बोलबाला… इंडिया आघाडीच्या पहिल्याच रॅलीला 15 लाखांची गर्दी
पटना | 3 मार्च 2024 : आरक्षण लागू झाल्यानंतर पोलिसांची भरती करायला मी तेजस्वीला सांगितलं होतं. दलित, मागास समाजातील मुलांना आणि मुलींना नोकरी मिळायला हवी ही त्यामागची भूमिका होती. त्यासाठी तेजस्वीने खूप मेहनत केली. रात्र न् दिवस काम केलं. दलित आणि मागासांना त्यांचे हक्क मिळवून दिले, असं लालूप्रसाद यादव म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी साथ सोडल्यानंतर राजद नेते लालूप्रसाद यादव यांची अनेकांनी साथ सोडली. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांची ताकद कमी झाल्याचं बोललं जात होतं. पण 75 वर्षाच्या लालूप्रसाद यादव यांनी हुंकार भरला आहे. अनेक व्याधींवर मात करून लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. लालूप्रसाद यादव यांनी आज बिहारमध्ये इंडिया आघाडीची रॅली आयोजित केली होती. इंडिया आघाडीची ही पहिलीच रॅली होती. या रॅलीचा कोणताच गाजावाजा करण्यात आला नव्हता. बोलबालाही करण्यात आला नव्हता. त्यामुळे ही रॅली यशस्वी होणार नाही, असं राजकीय वर्तुळातून सांगितलं जात होतं. पण लालूप्रसाद यादवांनी सर्व अंदाज फोल ठरवले आहेत. लालूंच्या आजच्या रॅलीला 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी झाली होती. इंडिया आघाडीसाठी हे शुभसंकेत मानले जात आहेत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत