महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

९ फेब्रुवारी सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे स्मृतिदिन

जन्म – १३ ऑगस्ट १८४८ (ठाणे)
स्मृती – ९ फेब्रुवारी १८९७ (मुंबई)

नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) जवळचे कन्हेरसर. लोखंडे यांच्या पत्‍नीचे नाव गोपिकाबाई व मुलाचे नाव गोपीनाथ असे होते माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. लोखंडे हे महात्मा फुल्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. इंग्रजांच्या काळात मील मध्ये काम करणाऱ्या कामगारांना सातही दिवस काम करावे लागत होते. आठवड्यात एकही दिवस हक्काची सुटी मिळत नसे. त्याकाळी ब्रिटिश अधिकारी रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होते. मात्र, कामगारांसाठी अशी काही परंपरा नव्हती.

कामगारांचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत बॉम्बे मिल हॅण्ड्‌स असोसिएशन स्थापना केली. त्यांनी इंग्रजांसमोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात त्यांनी असे नमूद केले की, आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी सहा दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी तसेच काही सामाजिक कामे करण्यासाठी मिळावा. नारायण मेघाजी लोखंडे यांनी तब्बल सात वर्ष रविवारच्या सुट्टीसाठी लढा दिला. २४ एप्रिल १८९० रोजी लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो मिल कामगारांनी मोर्चा काढला. लोखंडे यांनी केलेला तीव्र संघर्षाची दखल घ्यावी लागली. मिलमालकांनी बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुटीची मागणी मान्य केली. १८८४ मध्ये रविवारच्या सुट्टीसाठी सुरू झालेला संघर्ष १० जून १८९० रोजी संपला. त्यांचा हा लढा तब्बल सात वर्ष चालला. भारतीयांना हक्काची रविवारची सुट्टी मिळण्यात एका मराठी व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रातही रविवारच्या सुटीचं नातं जोडलं गेलेय ते भारतातल्या कामगार चळवळीचे पहिले नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळेच. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही भारतामध्ये आजही रविवारची सुट्टी आहे. लोखंडे यांना ट्रेड यूनियन आंदोलनाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. २००५ मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने पोस्टाचे तिकीट जारी केले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!