प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

मंगळवार दि. 26 रोजी कंत्राटी नोकर भरती च्या विरोधात मा. सुजात आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा.

चलो सांगली, चलो सांगली…

वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांचे वतीने 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे कंत्राटी नोकर भरती चा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय युवा नेते सुजात भाई आंबेडकर करणार आहेत. शासनाने जारी केलेल्या कंत्राटी नोकर भरती चा जीआर रद्द व्हावा, 62000 शाळांचा शाळा दत्तक योजनेअंतर्गत खाजगी कंपन्यांचा प्रवेश करण्याचा निर्णय रद्द करावा, स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई व्हावी, स्पर्धा परीक्षांची फी कमी करावी या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात विश्रामबाग चौक सांगली येथून सकाळी 11 वाजता होणार आहे. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी विद्यार्थी,युवक कामगार, कर्मचारी यांनी हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे…

संजय भूपाल कांबळे
जिल्हा संघटक तथा जिल्हा संपर्कप्रमुख
सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य, वंचित बहुजन आघाडी तसेच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा आणि राजगृह परिवार सांगली जिल्हा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!