महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महापालिका रुग्णालयाच्या कामकाजावरून ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले.

रुग्णालयाची इमारत ही छान दिसण्यासाठी नाही, तर नागरिकांना वैद्याकीय सेवा मिळण्यासाठी बांधली जाते, असे खडेबोल उच्च न्यायालयाने मुंब्रा येथील कौसा परिसरात गेल्या दशकभरापासून उभ्या राहत असलेल्या महापालिका रुग्णालयाच्या निमित्ताने बुधवारी ठाणे महापालिकेला सुनावले. तसेच, शंभर खाटांचे हे महापालिका रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करून गरजूंना परव़डणाऱ्या दरात वैद्याकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत याची माहिती सविस्तर प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.

दिवा, मुंब्रा आणि कळवा येथील नागरिकांना वैद्याकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी कौसा येथे शंभर खाटांचे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने मान्य केले. असे असताना रुग्णालयाच्या बांधकामांसाठी आणि ते कार्यान्वित करण्यासाठी अमर्याद विलंब केला जाणे हे समजण्यापलीकडचे असल्याची टिप्पणी न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी केली होती. तसेच, रुग्णालयाची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी आयोगही यावेळी नेमला होता. ‘असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स’ या स्वयंसेवी संस्थेने या रुग्णालयाच्या बांधकामाला होणाऱ्या विलंबाबाबत जनहित याचिका दाखल केली आहे.या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. परंतु, ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही, असे नमूद करून रुग्णालय कार्यान्वित न करण्याच्या महापालिकेच्या कमालीच्या उदासीन भूमिकेबाबतही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!