“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केला हल्लाबोल.”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. सरकारवर केवळ टीका करण्याची सवय ठाकरे यांना लागली आहे. सरकारवर टीका करणे हा उद्धव ठाकरे यांचा एकमेव कार्यक्रम आहे. त्यांच्याप्रमाणे असभ्य भाषेत बोलण्याची आमची संस्कृती नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले..
ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका शिंदे गटाने गंभीर घेतली असून गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने पुरावे जमा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा आग्रह शिंदे गटाच्या काही नेत्यांचा आहे तर ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन शिंदे यांनी कारवाईस नकार दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत