आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा डाव- छगन भुजबळ

मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा डाव असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीसाठी छगन भुजबळ हे मुंबई उच्च न्यायलयात दाखल झाले आहेत. यावेळी भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत