राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे (प्रोटॉन) पाचवे राज्य अधिवेशन संपन्न.

दिनांक ८ ऑक्टोंबर ( यवतमाळ) पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रा.डी.बी. धावारे.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे ५ वे राज्य अधिवेशन दिनांक ८ ऑक्टोंबर २०२३ रोजी यवतमाळ रॉयल पॅलेस पांढरकवडा रोड येथे संपन्न झाले. प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी (प्रोटॉन )यांचे अधिवेशन११ ते ५ या वेळात आयोजीत करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन किरण राव सरनाईक ( शिक्षक आमदार, अमरावती विभाग) यांनी केले. अधिवेशनाची अध्यक्षता गोरखनाथ वेताळ ( राष्ट्रीय, महासचिव प्रोटॉन नवी दिल्ली ) यांनी भूषविली. या अधिवेशनात नविन शैक्षणिक धोरण २०२० बहुजन समाजाला शिक्षण, व नोकरी पासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान आहे. नवीन पेन्शन योजना बहुजन कर्मचाऱ्याच्या वर्तमान आणि भविष्यकाळ करणारे आहे त्यावर. उपाय, आरएसएस प्रणित भाजपा सरकार कामगार कायद्यात बदल करून बहुजन समाजाला रोजगारहीन बनवत आहे त्यावर उपाय, अश्या गंभीर विषयावर या अधिवेशनात चिंतन चर्चा करण्यात आली. डॉक्टर मुरलीधर जाधव ( प्रोटॉन, विभागीय उपाध्यक्ष) कैलास मडावी ( महासचिव, राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी, संघ) राजेंद्र राजदीप ( प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, म. राज्य.) डॉक्टर सिद्धार्थ कांबळे ( राज्य सचिव, प्रोटॉन, महाराष्ट्र) यांनी पहिल्या सत्रात आपले विचार व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात शिक्षकांच्या प्रचलित अनेक संघटना असूनही बहुजन कर्मचारी यांच्यावर अन्याय _ एक गंभीर चिंतन, अंशतः अनुदान आणि समग्र शिक्षा अभियानतील शिक्षकांच्या समस्या _उपाय, महाराष्ट्रतील ६२ हजार शाळा दत्तक योजना अंतर्गत बड्या कार्पोरेट कंपन्याच्या ताब्यात देण्याचा निर्णय व कंत्राटी नोकर भरती प्रक्रिया शासनाचे, व शासक वर्गाचे खाजगीकरण करण्याचे षडयंत्र_ शिक्षण क्षेत्रातील वीर समस्यांच्या अनुषंगाने निर्णायक लढा उभा करण्यासंदर्भात प्रोटॉन ची भूमिका या विषयावर प्रा. डॉ. मोहन मिसाळ( संयोजक तक्रार निवारण समिति,प्रोटॉन म राज्य) रमेश मकासरे ( महासचिव प्रोटॉन म. राज्य) डॉ्. संजय धाबरडे) यांनी या विषयावर आपले विचार मांडले. पाहुण्यांचे स्वागत गजानन उल्हे पाटील यांनी केले. प्रा. तपोवन पाटील यांनी निमंत्रित केले. यावेळी शिवलिंग पटवे, सुरेश वानखेडे, प्रवीण रघुवन्सी, किशोर पागोरे, भाऊराव चव्हाण, योगेश डाफ, दीपक चवणे, विजय साळवे, जयश्री राऊत, आत्माराम धाबे, शिवानंद गुंड, राजू मडावी, सूरज राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आसलेल्या गोरख नाथ वेताळ सरांनी अभ्यास पूर्ण मांडणी करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी राज्य कार्यकारिणी प्रोटॉन, विभागीय कार्यकारिणी अमरावती विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत