लोकसभेतील ॲड. सुधीर खातू ह्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

लोकसभा,विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबईतील भाजपच्या बड्या नेत्या पक्षाला रामराम ठोकत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
सत्तेकडे ओढा असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही कमी असली, तरी त्यात सरकारचा साथ सोडून येणाऱ्यांचा विशेष समावेश नव्हता. मात्र मुंबईत ‘उलटी गंगा’ वाहताना दिसत आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभेतील ॲड. सुधीर खातू यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.
सुधीर खातू हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे बडे नेते आहेत. सध्या या मतदारसंघातून पूनम महाजन भाजपच्या तिकिटावर लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे महाजन यांचं टेन्शन वाढणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत