
इस्रोला गगनयानसाठी पहिले क्रू मॉड्यूल मिळालं असून त्याची पहिली अबॉर्ट चाचणी 25-26 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो पहिल्या मानवी मोहिमेसाठी सज्ज आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर आता गगनयान मोहिमेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इस्रोच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेची तयारी सुरु असून या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. गगनयान मोहिमेसाठीची महत्वाची चाचणी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी घेण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.
इस्रोला गगनयानसाठी पहिले क्रू मॉड्यूल मिळालं असून त्याची पहिली अबॉर्ट चाचणी 25-26 ऑक्टोबर या काळात करण्यात येण्याची शक्यता आहे. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ऑक्टोबरच्या अखेरीस गगनयान मोहिमेसाठी क्रू एस्केप सिस्टमची अबॉर्ट टेस्ट घेण्यास सज्ज आहे.
अबॉर्ट टेस्टमध्ये सुमारे 17 किमी उंचीवर चाचणी वाहनापासून क्रू मॉड्यूल वेगळे होणे अपेक्षित असेल. गगनयान मोहिमेत जर कोणतीही अडचण आली तर, अंतराळवीरांना मॉड्यूलसह सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी क्रू मॉड्यूल अबॉर्ट टेस्ट केली जात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास गगनयान मोहिमेसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल.
या चाचणीमध्ये गगनयानचं मॉड्यूल अवकाशात भरारी घेईल. त्यानंतर ठराविक उंची गाठल्यानंतर हे क्रू मॉड्यूल लाँच व्हेईकलपासून वेगळं होऊन समुद्रात लँड होईल. बंगालच्या उपसागरात क्रू मॉड्यूलने टचडाउन केल्यानंतर, भारतीय नौदलाचे जहाज आणि डायव्हिंग टीम वापरून क्रू मॉड्यूल पुन्हा ताब्यात घेईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत